वारंगल कारागृहातून हैदराबाद न्यायालयात नेताना पलायन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सिमीचे पाच कार्यकर्ते ठार झाले. तेलंगणाजवळील जनागाव येथे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
ठार झालेल्या आरोपींमध्ये हैदराबाद पोलिसांवर गोळीबार करणारा सिमीचा कार्यकर्ता विकरूद्दीनचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त पोलिसांवर गोळाबार करण्यात आल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सुलेमान, झकीर, आझाद आणि असिफ या सिमीच्या इतर चार संशयित कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यापैकी विकरूद्दीनचा पाकिस्तानच्या ‘आयएसआय’शी जवळचा संबंध होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2015 रोजी प्रकाशित
तेलंगणा : पळून जाण्याच्या केलेल्या प्रयत्नात सिमीचे पाच आरोपी ठार
वारंगल कारागृहातून हैदराबाद न्यायालयात नेताना पलायन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सिमीचे पाच कार्यकर्ते ठार झाले.
First published on: 07-04-2015 at 12:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana five alleged simi activists shot dead on way to court