scorecardresearch

“मंदिर, मशीद आणि…..;” गोवा निवडणुकांसाठी ममता बॅनर्जींनी सांगितला टीएमसीचा नवा अर्थ

तृणमूल काँग्रेस बहु-सांस्कृतिक आणि बहु-धार्मिक राज्याचा पुरस्कर्ता आहे, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

(संग्रहित छायाचित्र)

तृणमूल काँग्रेस बहु-सांस्कृतिक आणि बहु-धार्मिक राज्याचा पुरस्कर्ता आहे, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. गोव्यातील भाजपाच्या राजवटीला आपला पक्ष हा एकमेव पर्याय असल्याचाही दावा त्यांनी केला. पणजीत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ममता म्हणाल्या, “टीएमसी म्हणजे टेम्पल(मंदिर), मशीद आणि चर्च”. पंतप्रधान मोदी वाराणसीत काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करत असताना बॅनर्जींनी हे वक्तव्य केले आहे.

“आम्ही भाजपाशी लढत आहोत. जिंकण्याची काही शक्यता आहे का? आम्ही जिंकू शकू यावर तुमचा विश्वास आहे का? तुम्हाला आत्मविश्वास असेल तर मागे हटू नका. आम्ही इथं मत-विभागणीसाठी नाही, तर मतं एकत्र करण्यासाठी आणि टीएमसी आघाडीला विजयी करण्यासाठी आलो आहोत. हाच भाजपाविरोधात एकमेव पर्याय आहे. जर कोणाला पाठिंबा द्यायचा असेल, तर त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही भाजपाविरोधात लढणार हे आमचं ठरलंय. आम्ही मरू पण मागे हटणार नाही,” असं ममता बॅनर्जी पणजीत म्हणाल्या. त्या तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत.

गोवा हे हिंदूबहुल राज्‍य असून इथे मोठ्या प्रमाणात ख्रिश्‍चन राहतात. राज्यात मुस्लिमांची संख्याही बरीच आहे. पुढच्या वर्ष गोव्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पहिल्यांदाच आम आदमी पक्ष आणि तृणमुल काँग्रेस गोव्यात निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष नवनवी आश्वासनं देताना दिसत आहे. दरम्यान, राज्यात प्रदीर्घ काळ काँग्रेसची सत्ता राहिली असून जवळपास दशकापासून तिथे भाजपा सत्तेवर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Temple mosque church mamata banerjee new pitch for goa elections hrc

ताज्या बातम्या