Radhika Yadav Murder Case: २५ वर्षीय टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येच्या चौकशीत तिच्या वडिलांच्या आर्थिक बाबींबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. गुरुवारी गुरुग्रामच्या सुशांत लोक भागात आपल्या मुलीची गोळ्या घालून हत्या करणारा आरोपी दीपक यादव महिन्याला १५ लाख ते १७ लाख रुपये कमावतो. त्याचे गुरुग्राममध्ये एक आलिशान फार्महाऊस असून, त्याच्याकडे परवानाधारक बंदूकही आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

४९ वर्षीय आरोपीने हत्येची कबुली दिली असून, तो सध्या कोठडीत आहे. काल (गुरुवारी) सकाळी १०:३० च्या सुमारास दीपकने त्याच्या मुलीवर पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन गोळ्या तिच्या पाठीत लागल्या. गोळीबार केला तेव्हा पीडिता नाश्ता बनवत होती.

आरोपी दीपकचे मूळ गाव वझिराबादमधील त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने सांगितले की, दीपककडे गुरुग्राममध्ये अनेक मालमत्ता आहेत आणि तो दरमहा १५ लाख ते १७ लाख रुपयांपर्यंत कमावतो.

“दीपककडे गुरुग्राममध्ये अनेक मालमत्ता आहेत, ज्या भाड्याने दिल्या आहेत. त्याचे एक आलिशान फार्महाऊस आहे आणि गावातील प्रत्येकाला माहित आहे की तो श्रीमंत आहे”, असे एनडीटीव्हीशी बोलताना आरोपीच्या ओळखीच्या व्यक्तीने सांगितले.

दीपकने त्याच्या मुलीची परवानाधारक .३२ बोर रिव्हॉल्व्हरने हत्या केली होती. बंदुकीचा संदर्भ देत, ओळखीच्या व्यक्तीने सांगितले की, “ज्यांचे योग्य लोकांशी संबंध आणि पैसा असतो, त्यांनाच अशा प्रकारचा परवाना मिळू शकतो. कोणत्याही सामान्य माणसाला हे शक्य नाही.”

अहवालानुसार, राधिकाची हत्या तिच्या आर्थिक गोष्टी, इंस्टाग्राम रील्स आणि एका म्युझिक व्हिडिओमुळे झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे आरोपी दीपक अस्वस्थ होता. त्याने पोलिसांना सांगितले की, मुलीच्या कमाईवर अवलंबून असल्याचे म्हणत वझिराबादचे ग्रामस्थ त्याला टोमणे मारायचे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा इतके पैसे असतात…

दरम्यान, एनडीटीव्हीशी बोललेला आरोपी दीपकच्या ओळखीच्या व्यक्तीने त्याने पोलिसांसमोर केलेले दावे खोडून काढले आहेत. हा दीपकचा ओळखीचा व्यक्ती म्हणाला, “जेव्हा तुमच्याकडे इतके पैसे असतात, तेव्हा गावात कोण म्हणेल की तो त्याच्या मुलीच्या पैशावर जगतोय? दीपक हा खूप सुसंस्कृत माणूस आहे. त्याने आपल्या मुलीला टेनिस शिकवण्यासाठी आपले शिक्षणही सोडले होते. त्याने आपल्या मुलीसाठी २ लाख रुपयांचे टेनिस रॅकेट खरेदी केले होते. तो त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा. हत्येमागे टेनिस किंवा टेनिस अकादमी नसून वैयक्तिक कारण असू शकते.”