उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्य़ात सुरक्षा दलांशी गुरुवारी झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती लष्कराने दिली.
कुपवाडा जिल्ह्य़ातील लोलाब येथे पुश्ताई भागात अतिरेकी दडून असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू असताना अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यामुळे दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या फैरी झडल्या. यात तीन अतिरेक्यांना टिपण्यात आले.
ही शोधमोहीम अद्याप सुरू असून, ठार झालेल्या अतिरेक्यांची ओळख तसेच ते कोणत्या गटाचे आहेत याची माहिती लगेच मिळू शकली नाही, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2016 रोजी प्रकाशित
काश्मीरमध्ये चकमकीत तीन अतिरेकी ठार
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्य़ात सुरक्षा दलांशी गुरुवारी झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती लष्कराने दिली.

First published on: 22-04-2016 at 01:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorist killed in jammu and kashmir encounter