Tesla leases nearly 51000 sq ft showroom space in Gurugram : गेल्या महिन्यात मुंबईत टेस्लाचे शोरूम उघडण्यात आले आहे. यानंतर आle एलॉन मस्क यांच्या टेस्ला इंडिया मोटार अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणखी एका ठिकाणी ५१ हजार चौरस फूटांची जागा भाड्याने घेतली आहे.

सीआरई मॅट्रिक्सने मिळवलेल्या कागदपत्रानुसार, गुरुग्राममधील सोहना रोडवरील ऑर्किड बिझनेस पार्कमधील सुमारे ५१,००० चौरस फूट जागा नऊ वर्षांसाठी भाड्याने घेण्यात आले आहे. या जागेसाठी सुरूवातीला दर महिना ४०.१७ लाख रुपये इतके भाडे दिले जाणार आहे. आगामी वर्षात ही रक्कम वाढत जाणार आहे.

याचे शुल्क आकारण्यायोग्य क्षेत्र हे ३३,४७५ चौरस फूट इतके आहे आणि ही जागा गरवाल प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड कडून भाड्याने घेण्यात आली आहे. या जागेवर सर्व्हिस सेंटर, वेअर हाऊस आणि रिटेल आऊटलेट असणार आहे. समोर आलेल्या कागदपत्रांनुसार भाडेकरार हा १५ जुलै २०२५ पासून सुरू झाला आहे आणि याची नोंदणी ही २८ जुलै रोजी करण्यात आली आहे.

टेस्लाने मुंबईत नुकतेच शोरुम सुरू केले असून आता याच्या भारतातील दुसऱ्या शोरूमचे भाडे १२० रुपये प्रति चौरस फूट इतके आहे, ज्यामध्ये भाडे करारानुसार वार्षिक ४.७५ टक्क्यांची वाढ होईल.

भाड्याने घेतलेल्या जागेचा करार कसा आहे?

समोर आलेल्या माहितीनुसार या जागेचा भाडे करार हा १५ जुलै २०२५ पासून सुरू होईल. या कराराच्या पहिल्या वर्षासाठी भाडे ४०.१७ लाख रुपये, दुसऱ्या वर्षी ४२.०७ लाख रुपये, तिसऱ्या वर्षी ४४.०७ लाख रुपये, चौथ्या वर्षी ४६.१७ लाख रुपये, पाचव्या वर्षी ४८.३६ लाख रुपये, सहाव्या वर्षी ५०.६६ लाख रुपये, सातव्या वर्षी ५३.०६ लाख रुपये, आठव्या वर्षी ५५.५८ लाख रुपये आणि नवव्या वर्षी ५८.२२ लाख रुपये, असे कागदपत्रांवरून दिसून आले आहे.

समोर आलेल्या कागदपत्रांनुसार, या जागेचे भाडे दर महिन्याच्या ७ तारखेच्या आधी भरावे लागणार आहे. तसचे या जागेच ५१ पार्किंगच्या जागा देण्यात आल्या आहेत.

तसेच कंपनीने या जागेसाठी नऊ वर्षांचे २.४१ कोटी रुपये सेक्युरिटी डिपॉझिट भरण्यात आले आहे, असेही कागदपत्रात नमूद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला ११ ऑगस्ट रोजी दिल्लीतील वर्ल्डमार्क मॉल, एरोसिटीमध्ये एक शोरूम उघडण्याची योजना आखत आहे. पण याबद्दल टेस्ला किंवा गरवाल प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड या दोन्हींकडून कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाही.

सीआरई मॅट्रिक्सने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, गेल्या महिन्यात टेस्लाने अशीच मोठी जागा मुंबईतील कुर्ला परिसरातील भाड्याने घेतल्याचे समोर आले आहे. लोढा लॉजिस्टिक्स पार्क येथे २४,५६५ चौरस फूट गोदामाची जागा पाच वर्षांसाठी एकूण २४.३८ कोटी रुपये भाड्याने घेण्यात आली आहे.