scorecardresearch

“वकिली करायची असेल, तर वकिली करा; संसदेत जायचं असेल, तर…”, कपिल सिब्बलांचा शिंदे गटाच्या वकिलांना टोला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. यावेळी सिब्बल यांनी शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोलेही लगावले.

Kapil Sibbal Uddhav Thackeray Eknath Shinde Supreme Court
कपिल सिब्बल, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. यावेळी सिब्बल यांनी शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोलेही लगावले. “तुम्हाला वकिली करायची असेल, तर वकिली करा; तुम्हाला संसदेत जायचं असेल, तर संसदेसाठी तुमचा वेळ द्या,” असं मत सिब्बल यांनी व्यक्त केलं.

कपिल सिब्बल म्हणाले, “तुम्हाला वकिली करायची असेल, तर वकिली करा; तुम्हाला संसदेत जायचं असेल, तर संसदेसाठी तुमचा वेळ द्या, आपण एका वेळी एकच काम करू शकतो, एकावेळी दोन काम केली जाऊ शकत नाही, पक्षाबाबत महत्त्वाचे विषय न्यायालयासमोर आहेत आणि शिंदे गटाचे वकील इथं असावेत असं आम्हाला वाटतं, यामुळे दबाव वाढेल याची जेठमलानी यांना हळूहळू जाणीव होईल.”

“वकील, सनदी लेखापाल, डॉक्टर संसदेत नसावेत”

सिब्बल यांच्यानंतर ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवींनी सर्वोच्च न्यायलयाच्या सुनावणीत डाव्या नेत्याचं एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, “संसदेत डाव्या पक्षाच्या एका आघाडीच्या नेत्याने म्हटलं होतं की, वकील, सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊन्टंट), डॉक्टर आणि अशाप्रकारच्या पेशातील लोक संसदेत नसावेत. त्यांनी त्यांच्या व्यवसायावर लक्ष दिलं पाहिजे.”

“मी आणि अरूण जेटली लॉबीत बोलत होतो, तेव्हा…”

“त्यावेळी मी आणि अरुण जेटली लॉबीत बोलत होतो. तेव्हा ते आले. ते आमचे चांगले मित्र होते. ते म्हणाले की, तुम्हाला जे बेरोजगार लोक आहेत त्यांना संसदेत समाविष्ट करायचं आहे,” असंही सिंघवी यांनी नमूद केलं.

हेही वाचा : Live : सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला नोटीस, ठाकरे गटाला दोन आठवडे संरक्षण; वाचा सुनावणीची प्रत्येक अपडेट…

“असं सार्वजनिकपणे बोलू नका”

सिंघवींनी दिलेल्या उदाहरणावर कपिल सिब्बल यांनी हसतहसत असं सार्वजनिकपणे बोलू नका, असा सल्ला संघवींना दिला. यावर संघवी म्हणाले, “मी हे उदाहरण यासाठी देतो आहे की, सिब्बल यांना केवळ वकिलांविषयी नाही, तर अशा सर्वच व्यवसायांबद्दल हे सांगायचं आहे हे नमूद करायचं आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 17:37 IST