लाहोरमधील ‘डेली टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक रशीद रहमान यांनी व्यवस्थापनासोबतचे वाद विकोपाला गेल्याने राजीनामा दिला आहे. पाकिस्तानी लष्कराचा दबाव हे खरे कारण यामागे असल्याची उघड चर्चा आहे.
प्रखर डाव्या विचारांच्या आणि लष्करविरोधी स्तंभलेखकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि सोबतच आपल्या कर्मचाऱ्यांची २०१२ पासूनची पगाराची थकबाकी मिळवून देण्यासाठी चार वर्षे लढा दिल्यानंतर, ‘व्यवस्थापनाशी समेट न होण्याइतके मतभेद झाल्याचे’ कारण सांगून रहमान यांनी १० दिवसांपूर्वी पद सोडले. मात्र, आपला आठवडी स्तंभ थांबवण्यात आल्याचे, तसेच संपादक रशीद रहमान यांनीही राजीनामा दिला असल्याचे ट्ीवट दोघांपैकी एका स्तंभलेखकाने शुक्रवारी केल्यानंतरच हा राजीनामा उजेडात आला.
२६ नोव्हेंबरला या दैनिकाने फ्लोरिडास्थित पाकिस्तानी डॉक्टर मोहम्मद तकी यांचा स्तंभ प्रकाशित केला. तकी हे पाकिस्तानी लष्कराचे कट्टर टीकाकार आहेत. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या वॉशिंग्टन दौऱ्याबद्दल लिहिताना तकी यांनी लिहिले होते की, ‘त्यांनी अमेरिकेला अफगाणिस्तान मुद्दय़ाबाबत व तालिबानसोबतच्या चर्चेबाबत फसवे आश्वासन देण्यात यश मिळवले असावे.’
‘तुमच्या स्तंभातील मजकुराची छाननी होत असल्यामुळे तुमचा स्तंभ आम्ही छापू शकत नाही’, असे दैनिकाच्या लेख संपादकांनी शुक्रवारी आपल्याला फोन करून कळवले होते, असे तकी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2015 रोजी प्रकाशित
‘डेली टाइम्स’च्या संपादकाचा राजीनामा
पाकिस्तानी लष्कराचा दबाव हे खरे कारण यामागे असल्याची उघड चर्चा आहे.
Written by एक्स्प्रेस वृत्तसेवा
Updated:
First published on: 29-11-2015 at 00:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The daily times editor resigns