पीटीआय, रांची/सरायकेला

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार सोमवारी समाप्त झाला. येथे पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी तर उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ‘इंडिया’ आणि रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) अशा दोन्ही आघाड्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे. भाजपने केलेल्या जोरदार टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर, आरोपांच्या फैरी आदींनी निवडणूक प्रचाराचा पहिला टप्पा गाजला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

दरम्यान, ‘झारखंडमध्ये आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. येथे भाजपचे सरकार आल्यास घुसखोरांची ओळख पटवून त्यांना हुसकावून लावण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल तसेच त्यांनी बळकावलेल्या जमिनीवर पुन्हा दावा केला जाईल, आदिवासी महिलांशी विवाह करणाऱ्या घुसखोरांना जमिनीचे हस्तांतरण रोखण्यासाठी कायदा आणला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केली.

हेही वाचा – Keral IAS officer: हिंदू-मुस्लीम व्हॉट्सॲप ग्रुप बनवणं महागात पडलं; केरळमध्ये दोन आयएएस अधिकारी निलंबित

झारखंडच्या सरायकेला येथील प्रचार सभेला संबोधित करताना शहा यांनी राज्य सरकारवर टीका केली. झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही शहा यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) नेतृत्वाखालील सरकारवर केला.

झारखंडमध्ये भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरण : काँग्रेस

नवी दिल्ली : झारखंडमध्ये भाजपचा प्रचार केवळ सांप्रदायिक ध्रुवीकरणावर केंद्रित आहे. १० वर्षांच्या सत्तेनंतरही भाजप केवळ धार्मिक ध्रुवीकरणावर मते मागत असल्याचा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. येत्या १३ आणि २० नोव्हेंबर रोजी झारखंडमधील जनता सातत्य, जातीय सलोखा आणि आत्मसन्मानासाठी निर्णायकपणे मतदान करतील, असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केला. झारखंडमधील ‘इंडिया’ आघाडीचा प्रचार गेल्या पाच वर्षांतील सरकारच्या कामगिरीवर आहे, आम्ही सर्वसमावेशक आणि समृद्ध झारखंडसाठी आमची दृष्टी आदींवर लक्ष केंद्रित करत आहोत’, असेही रमेश म्हणाले.

हेही वाचा – शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक; ५० लाखांची मागितली होती खंडणी

आमदारांची खरेदी, सरकारे पाडण्यात मोदींना रस : खरगे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवताना त्यांच्यावर विरोधकांवर दडपशाही करण्याचा, निवडून आलेली सरकारे पाडण्याचा आणि आमदारांची खरेदी केल्याचा आरोप केला. अदानी आणि अंबानी यांच्याबरोबर केंद्र सरकार चालत असल्याचा आरोपही त्यांनी मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला. मोदी आणि शहा यांनी ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय संस्थांचा विरोधी नेत्यांविरोधात वापर केला. पण आम्ही घाबरत नाही. आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो आणि प्राणांची आहुतीही दिली, असा दावा खरगे यांनी केला.

Story img Loader