उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना करोनाची बाधा झाली आहे.  Vice President of India च्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती ट्विट करण्यात आली आहे. आज सकाळी त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना करोनाची लक्षणं नाहीत तसेच त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. व्यंकय्या नायडू यांची पत्नी उषा यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांना स्व विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपराष्ट्रपती सचिवायलाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्यंकय्या नायडू यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची रुटीन करोना टेस्ट अर्थात नियमित करोना चाचणी आली. ज्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती असल्याने त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The vice president of india who underwent a routine covid 19 test today morning has been tested positive scj
First published on: 29-09-2020 at 21:45 IST