युक्रेनमध्ये अडकलेल्या २४० भारतीय नागरिकांना घेऊन बुडापेस्टहून आलेले तिसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. तर, मृत्यूच्या विळख्यातून सुखरूपणे मायदेशी परतल्याचा आनंद युक्रेनमधून आलेल्या भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

Russia-Ukrain War Live: “पुतीन यांनी ही शोकांतिका लपवू नये”

yogi adityanath
“काँग्रेसला अल्पसंख्याकांना गोमांस खाण्याचा अधिकार द्यायचा आहे”, योगी आदित्यनाथ यांची टीका!
Rahul Gandhi criticizes Narendra Modi at Vijayapura in Karnataka
पंतप्रधान घाबरले आहेत, कदाचित अश्रू ढाळतील; राहुल गांधी यांची मोदींवर टीका
Supreme Court notice to Election Commission to hold fresh poll if NOTA gets more votes
सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; ‘नोटा’ला जास्त मते मिळाल्यास नव्याने मतदान घेण्याविषयी विचारणा
no alt text set
मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याची मागणी फेटाळली

युक्रेन आणि रशियामध्ये तणाव वाढत आहे. युद्धाच्या चौथ्या दिवशीही सतत हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या जवळपास १६ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शनिवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत सरकारने भारतीयांना बाहेर काढण्यासाठी या मिशनला ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव दिले आहे.

आज सकाळी, रोमानियाच्या राजधानीतून युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले होते. तेथे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी युक्रेनमधून आलेल्या नागरिकांचे विमानतळावर गुलाब देऊन स्वागत केले.

रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. पहिले विनमान AI 1944 बुखारेस्टहून काल संध्याकाळी २१९ लोकांना घेऊन मुंबईला आले आणि दुसरी विमान आज पहाटे दिल्लीला पोहोचले होते. त्यानंतर आता तिसरे विमान देखील दिल्लीला पोहचले आहे.