झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. हेमंत सोरेन यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं. सात ते आठ चौकशी झाल्यानंतर हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यानंतर हेमंत सोरेन यांनी त्यांच्या एक्स अकाऊंवरुन एक कविता पोस्ट केली आहे. काहीही झालं तरीही मी झुकणार नाही असा त्या कवितेचा आशय आहे.

काय आहे हेमंत सोरेन यांनी पोस्ट केलेली कविता?

यह एक विराम है
जीवन महासंग्राम है
हर पल लड़ा हूं, हर पल लड़ूंगा
पर समझौते की भीख मैं लूंगा नहीं

क्या हार में, क्या जीत में
किंचित नहीं भयभीत मैं
लघुता न अब मेरी छुओ
तुम हो महान, बने रहो

अपने लोगों के हृदय की वेदना
मैं व्यर्थ त्यागूंगा नहीं
हार मानूंगा नहीं…

जय झारखण्ड!

हेमंत सोरेन यांच्यावर ईडीची कारवाई

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी ईडीने हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. जमीन घोटाळा प्रकरणात हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यात आली. काही तासांच्या चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी काही वेळापूर्वीच त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर हेमंत सोरेन यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून चौकशी त्यानंतर अटक

झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली. यानंतर हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनात पोहोचले. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे आमदारही रांची येथील राजभवनात पोहोचले. चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केल्याचे सांगण्यात येतं आहे. चंपई सोरेन यांना ४१ हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. ८० सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठीची मॅजिक फिगर ४१ आहे.