जम्मू काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान, दोन जवान जखमी

शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि युद्धासाठी वापरता येतील अशी काही हत्यारे हस्तगत करण्यात आली.

जम्मू आणि काश्मीरमधील बंदिपुरा सेक्टरमध्ये शनिवारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा पोलिसांना यश आले. या कारवाई दरम्यान त्या दहशतवाद्यांकडे असलेली शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि युद्धासाठी वापरता येतील अशी काही हत्यारे हस्तगत करण्यात आली. ‘किलो फोर्स’ या भारतीय जवानांच्या तुकडीने ही कारवाई केली. या कारवाईत दोन भारतीय जवान जखमी झाले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. त्याआधी १७ ऑगस्टला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने शोकसागरात देश बुडालेला असताना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आपले डोके वर काढले होते. कुपवाडा आणि बांदिपोरा भागात भारतीय सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three terrorists killed and weapons and other war like stores recovered in bandipora