१. कर्नाटकचे काँग्रेस आमदार आर रोशन बेग यांची हकालपट्टी
कर्नाटक काँग्रेसने मंगळवारी पक्ष विरोधी कामे करणारे बंडखोर आमदार आर रोशन बेग यांना तत्काळ निलंबीत केले. यासंदर्भात कर्नाटक काँग्रेसेने काढलेल्या माध्यम परिपत्रकात म्हटले आहे की, पक्ष विरोधी कामे केल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आमदार आर रोशन बेग यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावास मंजूरी दिली आहे. वाचा सविस्तर : 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२.पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे<br /> आपला मुख्यमंत्री करायचाच असा पक्का निर्धार शिवसेनेने केला असून भाजपाशी जरी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून उद्याची विधानसभा भगवी करुन टाकू, त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे. वाचा सविस्तर : 


३. पराभवाच्या परतफेडीचे दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य
वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीच्या पुनरागमनामुळे आत्मविश्वास उंचावलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ बुधवारी न्यूझीलंडला नमवून २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक आहे. तसेच न्यूझीलंडचे विश्वचषक गुणतालिकेतील अग्रस्थान प्राप्त करण्याचे लक्ष्य आहे. वाचा सविस्तर : 

४. ‘म्हाडा’च पुनर्विकास करणार!
वसाहतींच्या रखडलेल्या पुनर्विकासासाठी ‘म्हाडा’नेच आता पुढाकार घेतला असून इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी विकासक होण्याचे ठरविले आहे. खासगी विकासकांप्रमाणे पुनर्वसनात दर्जेदार इमारती देण्याचे प्रस्तावीत करून म्हाडाने या इमारती ‘विकासक‘ म्हणून विकसित करण्याचे ठरविले आहे. वाचा सविस्तर : 

५.राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री
महाराष्ट्र विधिमंडळात आज सादर करण्यात आलेला 2019-20 या वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे उत्पन्न वाढवितानाच खर्च कमी करून सर्व घटकांना सर्वार्थाने पुढे घेऊन जाणारा असल्याने तो सर्वजनहिताय सर्वजनसुखाय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर : 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top five morning news bulletin mhada to developed stalled redevelopment project of colonies ssj
First published on: 19-06-2019 at 09:21 IST