१. मंत्रिपदांवरून चर्चेला जोर!
ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात स्थापन होणाऱ्या मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल आणि घटक पक्षांना किती मंत्रिपदे दिली जातील, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला जोर आला आहे. वाचा सविस्तर :
२. कैफ-युवराज, जोडगोळीची इंग्लंडमध्ये अजुनही दहशत ! इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केलं मान्य
३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होते आहे. त्याआधी सर्व संघ सध्या सराव सामन्यांमध्ये व्यस्त आहेत. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला विराट कोहलीचा भारतीय संघही सध्या इंग्लंडमध्ये कसून सराव करतोय. मात्र भारताच्या दोन माजी खेळाडूंची दहशत इंग्लंडमध्ये अजुनही कायम आहे. हे दोन्ही खेळाडू आहेत, मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह. वाचा सविस्तर :
३.सलमान म्हणतो, ‘मैंने प्यार किया’च्या यशाचं क्रेडिट लक्ष्मीकांत बेर्डेंना
बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जाणारा सलमान खान ३० वर्षांपूर्वी मैंने प्यार किया या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आला. या चित्रपटात भाग्यश्री, आलोक नाथ, रीमा लागू, राजीव वर्मा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट सुपरहिट होण्यामागे मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मोलाचा वाटा असल्याचं सलमान खानने म्हटलं आहे. वाचा सविस्तर :

४. ‘राहुल गांधींचा नकारात्मक प्रचार काँग्रेसला भोवला’
काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ नंतर दुसऱ्यांदा हा काँग्रेसला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा देत राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. ही घोषणा देशभरात विरोधकांनी पोहचवली, मात्र या घोषणेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या नकारात्मक प्रचाराचा काहीही परिणाम मतदानावर झाला नाही. वाचा सविस्तर :
५. राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी राज्यभरातील ७ हजार ४० उमेदवार आले आहेत. वाचा सविस्तर :