जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असून ‘लष्कर-ए-तोयबा’च्या टॉप कमांडरला ठार करण्यात आलं आहे. श्रीनगर जिल्ह्यातील परिंपोरा येथे चकमकीदरम्यान जवानांनी लष्करचा कमांडर आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावरुन एके-४७ सहित मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. नदीम अबरार याला सोमवारी अटक करण्यात आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नदीम अबरार अनेक जवानांच्या तसंच नागरिकांच्या हत्येमध्ये सहभागी होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच ठार करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवादी हा नदीम अबरारचा सहकारी होता असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हायवेवर हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हायवेवर जम्मू काश्मीर पोलीस तसंच सीआरपीएफ जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

परिंपोरा नाका येथे पोलिसांनी एक वाहन थांबवून ओळख विचारली असता मागे बसलेल्या व्यक्तीने आपल्या बॅगेतून ग्रेनेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवानांनी तात्काळ कारवाई करत त्याला पकडलं आणि त्याच्याकडील ग्रेनेड ताब्यात घेतलं असं पोलिसांनी सांगितलं. यानंर चालक आणि त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यावेळी मास्क काढल्यानंतर ती व्यक्ती लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचं समोर आलं.

जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराकडून अबरारची संयुक्त चौकशी करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आलं. चौकशीदरम्यान त्याने मलूरा येथील एका घऱात एके-४७ लपवून ठेवलं असल्याचं साांगितलं. यानंतर ते शस्त्र जप्त करण्यासाठी अबरारला सोबत नेण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा- जम्मूमध्ये हवाई दलाच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा तपास NIA कडे; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

मात्र यावेळी अबरारने तिथे आपला एक सहकारी लपून बसला असल्याची माहिती दिली नव्हती. अबरारला घेऊन सुरक्षा जवान पोहोचताच त्या दहशतवाद्याने गोळीबार सुरु केला. चकमकीदरम्यान सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले तर अबरारही गोळी लागल्याने जखमी झाला होता. यादरम्यान झालेल्या गोळीबारात घऱात लपून बसलेला दहशतवादी आणि अबरार दोघेही ठार झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top lashkar commander nadeem abrar killed in encounter in kashmirs parimpora sgy
First published on: 29-06-2021 at 09:38 IST