तेलंगणच्या नलंगोडा जिल्ह्यात एका खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या विमानाला शनिवारी झालेल्या अपघातात एक प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक ठार झाली.

गेल्या चार महिन्यांपासून प्रशिक्षण घेत असलेल्या महिमा या २८ वर्षांच्या तरुणीने सकाळी १०.२५ वाजताच्या सुमारास सेसना १५२ या प्रशिक्षणार्थी विमानातून उड्डाण केले आणि ते जिल्ह्यातील तुंगातुर्थी खेडय़ावरून उडत होते. यावेळी हे विमान एका शेतात कोसळत असल्याचे आणि त्याचे तुकडे होत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पाहिले. अपघातानंतर विमानाला आग लागली नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विमानाजवळ पोहचेपर्यंत वैमानिक मरण पावली होती. विमानात ती एकटीच होती. वैमानिक प्रशिक्षण संस्था आंध्र प्रदेशातील माचर्ला येथे असून ती तेलंगणपासून अगदीच जवळ आहे.

bmc swimming pool marathi news
मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले; २४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा
dubai flood
Dubai Flood: दुबईची झाली डुबई! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात, वाळवंटात आला पूर, पाहा VIDEO
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
girl kidnap viman nagar
खंडणीसाठी विमाननगरमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण

 या विमानाने प्रशिक्षणासाठीच असलेल्या एका हवाई पट्टीवरून उड्डाण केले होते.  तमिळनाडूची मूळ रहिवासी असलेली ही तरुणी सिकंदराबादमध्ये राहात होती. ती नेहमीचे उड्डाण करत होती आणि तळावर परत येणार होती. तमिळनाडूची मूळ रहिवासी असलेली ही तरुणी सिकंदराबादमध्ये राहात होती.

विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमान अपघातामुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे ट्विटरवर लिहिले. तपास पथक अपघांतस्थळी पाठवण्यात आले आहे. मात्र दुर्दैवाने आपण विद्यार्थी वैमानिक गमावला आहे, असे ते म्हणाले.