एकाच कुटुंबातील दोन महिलांवर मुकतिरतौक येथे सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आले असून तो सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा सदस्य आहे. रविवारी त्याला अटक करण्यात आल्याचे आमटा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बारून माखन याला गडियाला भागात अटक करण्यात आली. यातील इतर सात जणांना यापूर्वीच अटक करण्यात आले असून त्यांना सात दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. बलात्कार करण्यात आलेल्या दोन महिलांपैकी एक विशीतील आहे  व दुसरी तिची सासू आहे. मंगळवारी रात्री त्या घरात एकटय़ा असताना  त्यांच्यावर आठ जणांनी घरात घुसून बलात्कार करण्यात आला. माकप व काँग्रेसने असा आरोप केला होता की, तृणमूल समर्थक हे सामूहिक बलात्कारात सामील असून सत्ताधारी पक्ष त्यांना पाठिशी घालीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trinamool member arrested in rape
First published on: 10-02-2014 at 01:31 IST