Triple Murder: भारताच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतल्या साटबाडी गावात तिहेरी हत्याकांड घडलं आहे. सिद्धार्थ असं नाव असलेल्या मुलाने आई, वडील आणि भावाची हत्या केल्याची ही घटना आहे. याबाबतची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्या घरात या मुलाने हाताची नस कापून घेतली होती. त्यामुळे घरात रक्तही मोठ्या प्रमाणावर आढळलं अशीही माहिती पोलिसांनी दिली. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्या घरात पोहचल्यानंतर पोलिसांना तळ मजल्यावर दोन मृतदेह सापडले आणि पहिल्या मजल्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेम सिंह (वय ५०), रजनी (वय ४६) आणि ऋतिक (वय २४) अशी मृतांची नावं आहेत. या ठिकाणी गुन्हे अन्वेषण विभागाला बोलवण्यात आलं. या ठिकाणी फोटोही काढण्यात आले. तसंच गुन्हा घडला आहे तो सगळा भाग सुरक्षित करण्यात आला. पुढच्या औपचारिकता करण्यात सुर करण्यात आल्या आहेत. सिद्धार्थ या मुलानेच त्याच्या आई वडिलांची आणि भावाची हत्या केली. सिद्धार्थने त्यानंतर हाताची नस कापून घेतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ हा २२ ते २३ वर्षांचा तरुण आहे. त्याच्यावर मानसोपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थनेच त्याच्या कुटुंबाची हत्या केली आहे. या घटनेने राजधानी दिल्ली हादरली आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांनी आणखी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना मंगळवारी दुपारी एक फोन आला होता. एका मुलाने त्याच्या हाताची नस कापून घेतल्याचं या फोनवरुन सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी पोलिसांना मृतदेह आढळून आले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलीस आल्यानंतर सिद्धार्थ फरार झाला आहे. सिद्धार्थवर मानसोपचार सुरु होते, दरम्यान त्याचाही शोध पोलीस घेत आहेत. २०२४ च्या तुलनेत २०२५ या वर्षात हत्यांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. मागील सहा महिन्यांत हत्येची २५० प्रकरणं समोर आली आहेत. २०२४ मध्ये २४१ प्रकरणं समोर आली होती. त्या तुलनेत मागच्या आठ महिन्यांत या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.