जुलैमध्ये तेलंगण व जम्मू आणि काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरून तेलंगण राष्ट्रसमितीच्या खासदार आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांच्या विरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.जुलैमध्ये इंडियन एक्स्प्रेसच्या आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमात कविता यांनी जम्मू आणि काश्मीर तसेच तेलंगणचे बळजबरीने भारतात सामीलीकरण केल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून भाजपच्या कायदे आघाडीचे निझामाबाद शहराध्यक्ष के. करुणासागर यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याबाबत स्थानिक न्यायालयाच्या निर्देशानंतर गुन्हा दाखल केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2014 रोजी प्रकाशित
तेलंगण राष्ट्रसमिती खासदाराविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
जुलैमध्ये तेलंगण व जम्मू आणि काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावरून तेलंगण राष्ट्रसमितीच्या खासदार आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांच्या विरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
First published on: 12-08-2014 at 12:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trs mp k kavitha booked for sedition for saying jk and telangana forcefully annexed to india