“आमच्या प्रयत्नामुळे पाकिस्तान थोडा सुधरला आहे. पाकिस्तानने त्यांच्या जमीनीवरुन होणाऱ्या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्यात,” असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला आहे. दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी गुजरातमधील अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये केलेल्या भाषणात पाकिस्तानचे कान टोचले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानबद्दल काय म्हणाले ट्रम्प?

“पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी माझे सरकार प्रयत्न करत आहे. कट्टर इस्लामिक दहशवाद संपवण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करेल. भारत पाकिस्तान सिमेवरील दहशतवादी तळ संपवण्यासाठी आम्ही पाकिस्तानबरोबर काम करत आहोत. आमचे पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारत असले तरी त्यांनी दहशतवादी कारवायांसाठी आपली जमीन वापरु देऊ नये,” अशी अपेक्षा ट्रम्प यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. “दहशतवादापासून सामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही दोन्ही मिळून एकत्र काम करू. आम्ही पाकिस्तानसोबत मिळून सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न सुरु ठेऊ,” असं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलं.

भारताची पाठराखण

“प्रत्येक देशाला आपल्या सिमांचे संरक्षण कऱण्याचा हक्क आहे,” असं सांगत ट्रम्प यांनी भारताने पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशवादी कारवायांविरोधातील मोहिमेला पाठिंबा दर्शवला. पाकिस्तानमधील दहशतवादी गटांची नावे घेत ट्रम्प यांनी भारताच्या शेजारी देशावर थेट निशाणा साधला.

आयसिसबद्दल ट्रम्प म्हणाले…

“कट्टर इस्लामिक दहशतवाद संपवण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील,” असा विश्वास व्यक्त करताना ट्रम्प यांनी आयसिसचा उल्लेख केला. “आम्ही आयसिसचा १०१ टक्के खात्मा केला आहे. भविष्यातही इस्लामिक दहशतवादाविरुद्ध दोन्ही देश लढत राहतील, असा माझा विश्वास आहे,” असंही ट्रम्प यावेळी बोलताना म्हणाले.

दोन देशांमधील संबंध दृढ होतायत

भारत आणि अमेरिकेचे संबंध दिवसोंदिवस दृढ होत असल्याचे मत ट्रम्प यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं. “प्रत्येक अमेरिकन नागरिक भारतीयांना पसंत आणि प्रेम करतोय. भारत आणि अमेरिकेची मैत्री आजपर्यंतची सर्वात दृढ मैत्री आहे. याआधी दोन्ही देशांत इतकी मैत्री दृढ नव्हती,” असं ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trump in india donald trump asks pakistan to stop terrorism scsg
First published on: 24-02-2020 at 14:41 IST