तुर्कीतील नाईट क्लबवर ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या हल्ल्यात ३९ लोकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी उझबेकिस्तानच्या एका नागरिकाला अटक केली आहे. अब्दूल कादिर माशारिपोव्हवर हल्ला केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. इस्तंबूलमधून त्याला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात इस्त्रायल, फ्रान्स, ट्यूनिशिया, भारत, बेल्जियम, जॉर्डन आणि सौदी अरबचे नागरिक मारले गेले होते. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले होते. इस्लामिक स्टेटने (आयएस) या हल्ल्याची जबाबदारी घेतली हाती. सीरियामध्ये आयएसविरोधात सुरू असलेल्या कारवाईत सहभागी झाल्यामुळे तुर्कीचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोळीबाराच्या वेळी हल्लेखोर एका टॅक्सीने क्लबमध्ये आला होता. त्यानंतर त्याने कारमधून बंदूक काढून थेट क्लबमध्ये घुसला होता. क्लबमध्ये मोठ्याप्रमाणात लोकांची उपस्थिती सुरू होती. प्रत्येकजण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जल्लोष करत होता. त्याचवेळी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला होता. तेव्हापासून पोलिसांकडून हल्लेखोराचा तपास सुरू होता. पोलिसांनी ज्यावेळी त्याला अटक केली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जखमांचे निशाण दिसून आले.
यापूर्वी तो तुर्कीमधून पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा अंदाज लावण्यात आला होता. याला अटक करण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. अब्दूल कादिरच्या अटकेने पोलिसांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी तुर्कीला सुरक्षित बनवणे आणि दहशतवादी हल्ल्यापासून रोखण्यासाठी तंत्र विकसित करण्याचे मोठे आव्हान आहे. पोलिसांनी जेव्हा हल्लेखोराला अटक केली तेव्हा त्याच्यासमवेत त्याचा ४ वर्षांचा मुलगा होता. तो आपल्या मित्राच्या घरात लपला होता, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीबरोबर त्याचा मित्र आणि अन्य तीन महिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त तुर्की माध्यमांनी दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkish police catch istanbul nightclub attacker
First published on: 17-01-2017 at 10:16 IST