घरात घुसून टीव्ही पत्रकारावर झाडली गोळी , हल्लेखोर फरार

देशाची राजधानी दिल्लीपासून अगदी जवळ असलेल्या गाझियाबाद येथे एका टीव्ही पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोराने रविवारी पत्रकाराच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली.

देशाची राजधानी दिल्लीपासून अगदी जवळ असलेल्या गाझियाबाद येथे एका टीव्ही पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोराने रविवारी पत्रकाराच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली. अनुज चौधरी असं पत्रकाराचं नाव आहे, त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून फरार हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोराने पत्रकाराच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली. नेमके किती हल्लेखोर होते याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. अनुज चौधरी हे एका हिंदी न्यूज चॅनलमध्ये काम करतात. त्यांची पत्नी बहुजन समाज पक्षाची नगरसेवक आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, तरीही आम्ही सर्व बाजूंनी घटनेची चौकशी करत आहोत असं पोलीस म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tv journalist shot inside his home by gunmen in ghaziabad