सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’ हटवली

व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’ पुन्हा ब्लू टिक पुन्हा सक्रिय करण्यात आली. मात्र, मोहन भागवत यांच्या हॅण्डलवरील ब्लू टिक अद्यापही काढलेलीच आहे.

RSS chief Mohan Bhagwat twitter handle blue tick
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आल्याचं समोर आलं.

नवीन नियमावलीवरून ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्या संघर्षाची ठिणगी पडलेली असतानाच नवा वाद उभा राहण्याची चिन्हं आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टिक ट्विटरने हटवली होती. केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने अकाऊंटसमोर पुन्हा ब्लू टिक सक्रीय केली आहे. याचा धुरळा खाली बसत नाही, तोच ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकली आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं ट्विटरवर वैयक्तिक अकाऊंट आहे. मात्र, उपराष्ट्रपती झाल्यापासून ते कार्यालयीन ट्विटर हॅण्डल वापरत आहे. त्यामुळे त्यांचं वैयक्तिक ट्विटर हॅण्डल सक्रीय नसल्याचं सांगत ट्विटरने नियमानुसार कारवाई केली. ट्विटरने ब्लू टिक काढून टाकली. मात्र, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याप्रकरणी नाराजी व्यक्त केल्यानंतर ब्लू टिक पुन्हा सुरू केली. व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलचं प्रकरण मिटत नाही, तोच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आल्याचं समोर आलं.

संबंधित बातमी : ट्विटरकडून चूक दुरुस्त! उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटला पुन्हा ‘ब्लू टिक’

venkaiah naidu twitter blue tick
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आल्यानं सरकारने आणि भाजपाने नाराजी व्यक्त केली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्ल टिक पुन्हा सुरू करण्यात आली असली, तरी मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक पुन्हा सक्रीय केलेली नाही. संघाचे अनेक नेत्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढण्यात आल्याचं वृत्त आहे. मोहन भागवत यांचं ट्विटर हॅण्डल २०१९मध्ये तयार करण्यात आलेलं आहे. पण, त्यावरून एकही ट्विट करण्यात आलेलं नाही.

संबंधित बातमी : …अन्यथा परिणामांना तयार राहा!; केंद्र सरकारचा Twitter ला शेवटचा इशारा

Twitter drops verified blue tick from RSS chief Mohan Bhagwat's handle
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आल्याचं समोर आलं.

ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचं नाव बदललं गेलं असेल किंवा एखादं अकाउंट सक्रिय नसेल वा अपडेट होत नसेल, तर ते अनव्हेरिफाइड केलं जातं आणि ‘ब्लू टिक’ही हटवली जाते. दुसरी गोष्टी म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल मात्र नंतर त्यानं कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील तर ब्लू टिक हटवली जाते. खात्रीशीर, विश्वसनीय आणि सक्रिय असलेल्या ट्विटर खात्याबद्दल इतर वापरकर्त्यांना आश्वस्त करण्यासाठी ट्विटरकडून ब्लू टिक अर्थात ब्लू व्हेरीफाईड बॅच दिला जातो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Twitter blue tick venkaiah naidu twitter handle blue tick mohan bhagwat rss chief twitter handle twitter action bmh

ताज्या बातम्या