टिवटर या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसाठी टिवटरने आपत्ती काळामध्ये दक्ष करणारी एक विशेष यंत्रणा सुरू करणार असल्याचे बुधवारी जाहिर केले.   
टिवटरवर खाते असणाऱ्या स्मार्टफोनधारकांना संकट व आपत्ती काळामध्ये टिवटरवर लघुसंदेश पाठवण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी टिवटर अॅप वापरणारांना त्यांचा मोबाईल नंबर टिवटरकडे नोंदणी करण्यात आलेल्या संस्थांना द्यावा लागणार आहे.
अमेरिकन फेडरल एमर्जन्सी मॅनेजमेंट एजेन्सी, टोकिओ डिजास्टर प्रिव्हेंशन सर्व्हीस आणि जागतिक आरोग्य संघटना(डब्लूएचओ)या त्यापैकी काही संस्था आहेत.  
दक्षता संदेश योजणा एक वर्षामध्ये सुरू होणार असल्याचे टिवटरकडून सांगण्यात आले. पूर्व अमेरिकेमध्ये ‘हूर्रिकेन सँडी’ वादळ आले होते त्यावेळी टिवटरने त्याच्या वापर कर्त्यांना लाईफलाइन सेवा पूरवली होती. अमेरिकेच्या नागरीकांना वादळाच्या प्रगतीची वेळोवेळी माहिती देवून वादळापासून वाचण्यास मदत केली होती.
त्याच प्रकारची सेवा देवून २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या ‘त्सुनामी’ पासून लोकांना सावध करण्याचे काम केले होते. सुरूवातीला ही सेवा अमेरिका, जपान व कोरियामध्ये सुरू करण्यात आली असून, काही काळात सर्वच देशांमध्ये ती सुरू करण्यात येणार असल्याचे टिवटर कडून सांगण्यात आले.
स्मार्टफोनच्या काळामध्ये टिवटरची लोकांना आपत्तीबद्दल दक्ष करणारी ही सेवा आपत्ती व्यवस्थापन संस्तांसाठी देखील महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे अमेरिकन फेडरल एमर्जन्सी मॅनेजमेंट एजेन्सीचे(एफइएमए) चे अधिकारी क्रेईग फुगाटे म्हणाले.
“आता आपल्याकचे दोन मार्ग आहेत, लोकांना संकटकाळात दक्ष करण्यचे काम टिवटर सेवा करणार असून, आपत्ती व्यवस्थापन संस्थांनादेखील फिडबॅक मिळण्यासाठी मदत होणार आहे,” असे क्रेईग म्हणाले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter introduces alert system for emergencies and disasters
First published on: 26-09-2013 at 09:02 IST