राष्ट्रपती रामनाथ कोविंद मागच्या मंगळवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी विमानतळावर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी आणि राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांनी कोविंद यांचे स्वागत केले. यावेळी ममता बॅनर्जी यांनीही कोविंद यांचे स्वागत करत त्यांना एक पेंटींग भेट म्हणून दिले. विशेष म्हणजे हे पेंटींग ममता दीदींनी स्वत: काढले होते. राष्ट्रपतींना हे पेंटींग खूप आवडले. त्याबद्दल त्यांनी ममता बॅनर्जी यांचे विशेष आभारही मानले. हे पेंटींग कायम आपल्याजवळ राहील तसेच ते राष्ट्रपती भवनात लावण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले. आता ममता बॅनर्जींचे खुद्द राष्ट्रपतींकडून इतके कौतुक करण्यात आले असले तरीही सोशल मीडियावर हे पेंटींग्ज ट्रोल होत आहेत.

https://twitter.com/ashishtikoo31/status/804245515948933120

ट्विटरवर या पेंटींग्जवरुन जोरदार चर्चा सुरु असून अनेकांनी बॅनर्जी यांचे ट्विट रिट्विट केले आहेत. @famouseaunty या हँडलवरुन हे फोटो व्टिट करण्यात आले आहेत. या पेंटींग्जची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडविण्यात आली आहे. काहींनी त्यांच्या या पेंटींग्जची तुलना वेलकम चित्रपटातील अनिल कपूर याने काढलेल्या पेंटींग्जशी केली आहे. या पेंटीग्जचा अर्थ नेमका काय आहे. यातून ममता बॅनर्जींना नेमके काय सांगायचे आहे असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे.