पुन्हा एकदा मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर वादात सापडली आहे. ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात आधीच तणावाचे वातावरण आहे आणि आता ट्विटरची अडचणीत आणखी वाढू होऊ शकते. ट्विटरच्या संकेतस्थळावरील भारताच्या नकाशावर छेडछाड केली गेली आहे. ट्विटरने आपल्या वेबसाइटवर जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना स्वतंत्र देश म्हणून दाखवले आहे.

ट्विटरच्या करिअर पेजवरील दाखवल्या गेलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश नाही, म्हणजेच तो भारताच्या सीमेबाहेर दाखवला आहे. ट्विटरच्या नकाशावर सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. मात्र ट्विटरकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारत सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. सरकार यासंदर्भात बरीच तथ्ये संकलित करीत आहे, जसे की नकाशामध्ये हा बदल कधी झाला, वेबसाइटवर हा नकाशा कधी ठेवला गेला आणि नकाशामधील बदलामागील हेतू काय आहे. ट्विटरवर हा नकाशा देणारे लोक कोण आहेत, कोणी हा नकाशा लावला आहे? अशा अनेक गोष्टींबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सरकारतर्फे ट्विटरवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?
S jaishankar
“तुमच्या घराचं नाव बदललं तर ते माझं होईल का?”, अरुणाचल प्रदेशवरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला पुन्हा सुनावलं!

ट्विटरच्या करिअर पेजवरील ट्वीप लाइफ विभागात जगाचा नकाशा आहे. येथून कंपनी ट्विटर टीम जगात कोठे आहे हे दाखवते. या नकाशामध्ये भारत देखील आहे परंतु भारताचा नकाशा विवादित म्हणून दर्शविला गेला आहे. याआधीही लडाखचा भाग भारताचा भाग म्हणून दाखविला गेला नव्हता. मात्र, नंतर ती चूक दुरुस्त करण्यात आली.

सध्या भारत सरकार उघडपणे ट्विटरला विरोध करत आहे आणि केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरची भारताबद्दल दुटप्पी वृत्ती आहे असे म्हटले होते. त्यामुळे आता ही बाब अधिक गंभीर होऊ शकते. ट्विटरचा हेतू योग्य वाटत नाही असेही रवीशंकर प्रसाद यांनी आधी म्हटले होते.

याआधी देखील १२ नोव्हेंबर रोजी ट्विटरने एका नकाशाद्वारे भारतातील लडाखचा भूभाग हा चीनच्या हद्दीत दाखवला होता. ट्विटरने प्रसिद्ध केलेल्या नकाशावर भारताने आक्षेप घेतला होता. याची दखल घेत ट्विटरने आपल्या या चुकीबद्दल माफी मागितली होती. तसेच येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ही चूक सुधारणार असल्याचे आश्वासनही दिले आहे.