बिहारच्या भोजपूर जिल्ह्य़ातील आझिमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा माओवाद्यांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.भोजपूर आणि रोहतास जिल्ह्य़ाच्या सीमेवर बुधवारी छेटी पासवान या माओवाद्याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नुरपूर गावात छापा टाकला आणि सोनधारी यादव आणि रामबाबू चौधरी या माओवाद्यांना अटक केली, असे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र झा यांनी सांगितले.या माओवाद्यांकडून पाच सिलेंडर बॉम्ब, दशी बनावटीचे एक पिस्तूल, सहा डिटोनेटर्स आणि स्फोटके तयार करण्यासाठी लागणारी अन्य सामग्री जप्त केली. माओवादी हिंसाचाराच्या आठ गुन्ह्य़ांमध्ये यादव पोलिसांना हवा होता. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वातावरण दूषित करण्यासाठी शस्त्रे आणि स्फोटकांचा वापर केला जाणार होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two maoists arrested in bihar
First published on: 09-10-2015 at 00:50 IST