जम्मू : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन अतिरेकी मारले गेले. रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. आणखी एक अतिरेकी घटनास्थळी असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या ‘बिहार पॅटर्न’ची अफवा; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

सर्वच पक्षांनी प्रचाराची राळ उडविली असताना अतिरेकी गट घातपात घडविण्याच्या तयारीत आहेत. उधमपूर जिल्ह्यातील बसंतगढमध्ये जंगलात अतिरेकी दडून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या पथकाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली. या वेळी अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन अतिरेकी मारले गेले. ठार झालेले अतिरेकी हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या सहा महिन्यांत यशस्वी झालेली दुर्गम जंगलामधील ही पहिलीच मोठी कारवाई आहे