गुजरातमधील वडोदराच्या रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या पाळीव जनावरांच्या समस्येचा बंदोबस्त करण्यासाठी, येथील न्यायालयाने या मोकाट जनावरांच्या मालकांना तीन महिने तुरूंगवासाची सुनावली आहे. गायींना रस्तावर मोकाट सोडून येणाऱ्या जाणाऱ्यांना धोका निर्माण केल्याबद्दल ही शिक्षा सुनावली गेली आहे.
अतिरिक्त न्यायाधीश एम के चौहान यांनी याप्रकरणी अल्पशे राबीडी व हितेश राबाडी यांना मंगळवारी शिक्षा सुनावत प्रत्येकी ५ हजार रूपयांचा दंड ठोठवला. सरकारी वकील स्मृती त्रिवेदी यांनी न्यायालयात आपली बाजू मांडत सांगितले की, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी धोक्याबरोबच मोकाट जनावरांनी रस्त्यावर घाण देखील केली. याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायलयात ९ साक्षीदारांना देखील हजर केल्या गेले. यानंतर न्यायालयाने अल्पेश व हितेश राबाडी यांना शिक्षा सुनावली.
हे प्रकरण जवळपास दोन वर्षे अगोदरचे आहे. जुलै २०१७ मध्ये वडोदरा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर २५ ते ३० पाळीव जनावर रस्तावर मोकाट फिरत असल्याचे आढळले होते. ज्यामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यानंतर नगरपालिकेकडून मंजालपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.