गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे खासदार अनंत हेगडे यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या विधानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात अनंत हेगडे भाजपाला बहुमत मिळाल्यास संविधानात बदल करण्यासंदर्भात वक्तव्य करताना दिसत आहेत. यासंदर्भात देशभरात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यावर आता ठाकरे गटाकडून तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे. या विधानाचा संदर्भ घेत ठाकरे गटानं भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“भाजपा खासदार अनंत हेगडे यांनी ‘चारशे पार’चे मनसुबे उघड केले आहेत. भाजपाला चारशे पारचे बहुमत यासाठी हवे आहे की, त्या पाशवी आकड्याच्या बळावर भाजपास देशाचे पवित्र संविधान बदलायचे आहे. हे वक्तव्य गंभीर आहे”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून अनंत हेगडेंच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.

pm narendra modi slams congress for sam pitroda inheritance tax remark
सामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा; पित्रोदांच्या ‘वारसा कर’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?

“पुतीन यांच्याप्रमाणेच मोदींना…”

“मुसोलिनी, हिटलर, रुमानियाचे राज्यकर्ते, युगांडाचा इदी अमिन, लिबियाचा गद्दाफी यांनी संविधान न मानता स्वतःची हुकूमशाही प्रस्थापित केली. रशियाचे तहहयात अध्यक्ष पुतीन यांनीही त्यांच्या देशाचे संविधान आपल्या मनाप्रमाणे बदलून घेतले. संविधानात बदल करून पुतीन यांनी स्वतःला आजन्म अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा केला. म्हणजे रशियात निवडणुका वगैरे व्यवस्था मोडीत निघाली. पुतीन हाच कायदा व पुतीन हेच संविधान. भारताचे संविधान बदलून भाजपला पुतीन यांच्याप्रमाणे मोदी यांना भारताचे बादशहा म्हणून नेमणूक करायची आहे काय? म्हणजे मोदी हेच मोदी यांचे कायम उत्तराधिकारी राहतील”, अशी भीती ठाकरे गटानं व्यक्त केली आहे.

भास्कर जाधव अजित पवार गटात जाणार? धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “एक चांगली व्यक्ती आमच्याकडे…”

मोदींच्या आर्थिक सल्लागारांचं ‘ते’ विधान!

“मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक रॉय यांनीही देशाला आता नवे संविधान हवेच असे सांगितले आहे. मोदींचे हे सल्लागार सांगतात, ‘आपण कोणताही वादविवाद करतो. तो बहुतांशी संविधानापासून सुरू होतो आणि त्यावरच संपतो. त्यात आता थोडेफार बदल करून चालणार नाही. आपण ड्रॉइंग बोर्डवर परत जाऊन नव्याने सुरुवात केली पाहिजे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य आणि समता या शब्दांना आता काय अर्थ आहे? आपल्याला आता स्वतःसाठी एक नवे संविधान तयार करावे लागेल’, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

“नव्या संसद भवनाच्या पायरीवर संविधानाचा खून केला की…”

“सामान्यांचे प्रश्न सोडविण्यात मोदींचे सरकार अपयशी ठरले आहे. अपयशावर कोणी बोलू नये म्हणून संविधान बदलले जाईल व बोलणाऱ्यांच्या जिभा कापल्या जातील. संविधानाचा खून करण्याची तयारी सुरू आहे व त्यासाठी ४०० मारेकरी तयार केले जात आहेत. भाजपचा ‘चारशे पार’चा नारा ही संविधानाच्या हत्येची तयारी आहे. नव्या संसद भवनाच्या पायरीवर संविधानाचा खून एकदाचा केला की भाजपच्या नव्या संविधान लिखाणाची सुरुवात होईल”, अशी भीतीही ठाकरे गटानं व्यक्त केली आहे.