ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थातच बीबीसीने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर अधारित एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा थेट संबंध आहे, असं भाष्य करणारं कथानक बीबीसी माहितीपटातून चित्रित करण्यात आलं होतं. हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर केंद्र सरकारने यावर बंदी घातली आहे. बीबीसीचा माहितीपट हा प्रोपगंडाचा भाग असल्याची टीका सरकारकडून केली आहे.

दरम्यान, ब्रिटनमध्ये भारतीय समुदायाकडून आंदोलनं करण्यात आली आहेत. या घटनाक्रमानंतर ब्रिटन सरकारने बीबीसीची पाठराखण केली आहे. बीबीसी ही स्वतंत्रपणे काम करणारी वृत्तसंस्था आहे, असं ब्रिटन सरकारने सांगितलं आहे.

हेही वाचा- “संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी…”, नागपूरमधील विजयानंतर मिटकरींची फडणवीस-बावनकुळेंवर टोलेबाजी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बीबीसी ही स्वतंत्रपणे काम करते आणि आम्ही भारताला अजूनही अत्यंत महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय भागीदार मानतो, हे आम्ही आवर्जून सांगतो’, असे ब्रिटन सरकारच्या प्रवक्त्याने सांगितलं. २००२ सालच्या गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या ‘इंडिया – दि मोदी क्वेश्चन’ या माहितीपटाचा भारताने निषेध केल्याच्या संबंधात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ‘येत्या दशकांमध्ये भारतासोबतचे आमचे संबंध आम्ही दृढ करत राहू आणि ते आणखी बळकट होतील याबद्दल आम्हाला विश्वास आहे’, असंही प्रवक्त्याने सांगितलं.