एपी, कीव्ह : रशियासोबत आमच्या अटींवर शांतता चर्चा होऊ शकते, अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी मांडली. आतापर्यंत व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत बोलण्यास अजिबात तयार नसलेल्या झेलेन्स्कींनी एक पाऊल मागे घेतले आहे. अर्थात त्यांच्या अटी पुतिन मान्य करणार का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

जागतिक समुदायाने पुतिन यांना खऱ्याखुऱ्या शांतता चर्चेसाठी तयार करावे, असे आवाहन झेलेन्स्की यांनी केले. रशियाने हल्ला केल्यापासून ते ‘रशियाशी चर्चा केवळ अशक्य आहे,’ असेच सांगत होते. मात्र अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमुळे चित्र काहीसे बदलले आहे. अमेरिकेचे सेनेट आणि हाऊसमध्ये रिपब्लिकन पार्टीचे प्राबल्य झाल्यास युक्रेनला आतासारखी आर्थिक आणि लष्करी मदत सुरू राहणे अवघड असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी आपली भाषा बदलली असली तरी त्यांनी घातलेल्या अटी या अत्यंत जाचक असल्यामुळे पुतिन तयार होण्याची शक्यता कमी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

    झेलेन्स्कींच्या अटी

  • रशियाने बळकावलेला प्रांत परत करावा
  • युद्धात झालेल्या संहाराची नुकसान भरपाई द्यावी
  • रशियाने केलेल्या युद्धगुन्ह्यांचे खटले सुरू करावेत