गोव्यात राजधानी पणजीपासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण शहरात बांधकाम सुरू असताना इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगा-याखाली  ४०जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी ढिगा-याखालून सहा मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप  मिळालेली नाही.
इमारतीत ४० मजुर काम करत होते. दुपारी तीनच्या सुमारास ही इमारत कोसळल्याचे पोलीस अधिक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी सांगितले. पोलीस आणि आपत्कालीन पथकाच्या मदतीने घटनास्थळी बचाव कार्य वेगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.