ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणांवर कायमच विरोधकांकडून टीका केली जाते. त्यांना कायम सरकारच्या पिंजऱ्यातले पोपट असंही म्हटलं जातं. आता ईडी कारवाया किती प्रमाणात होत आहेत? याची टक्केवारीच अमित शाह यांनी सांगितली.

काय म्हणाले अमित शाह?

“आमची भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम आहे. काँग्रेसच्या खासदाराच्या घरातून कोट्यवधी रुपये मिळाले आणि कारवाई करू नका म्हटलं तर कसं चालेल? तृणमूलच्या मंत्र्याकडे मशीनने मोजावे लागतील एवढे पैसे मिळतील तर कारवाई करू नये का? ईडीने जेवढ्या कारवाया केल्या. त्यातील पाच टक्के राजकारणी आहेत. तर ९५ टक्के इतर लोक आहे. पण अफवा पसरवली जात आहे. जे लोक भ्रष्टाचार करत आहेत, तेच लोक हा भ्रम पसरवत आहेत” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union home minister amit shah important statement about ed action against politicians scj
First published on: 28-02-2024 at 09:00 IST