उत्तर प्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निषाद शनिवारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना चांगलेच संतापले. यावेळी त्यांनी स्टेजवरुनचच माईक खाली फेकून दिला. आपण भाषण करत असताना कार्यकर्ते आपापसात चर्चा करण्यात व्यग्र असल्याने संजय निषाद पक्ष कार्यकर्त्यांवर संतापले आणि खडे बोल सुनावले.

कार्यकर्ते चर्चा करण्यात व्यग्र असल्याचं पाहून संतापलेले संजय निषाद म्हणाले की “जर आमच्यापेक्षा मोठे नेते असाल तर बोला, अन्यथा ऐका”. यानंतर संजय निषाद यांनी हातातील माईक खाली फेकून दिला. नेत्याचा रौद्रवतार पाहून कार्यकर्ते, तर नेते शांत झाले आणि त्यांना पुन्हा एकदा भाषण करण्याची विनंती केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माईक पुन्हा हाती घेतल्यानंतर संजय निषाद यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सुनावलं. “किती मोठे नेते आहात? दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर चालत आहात ना? बर्बाद व्हाल”. यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्याकडे बोट दाखवत म्हटलं की “धीरेंद्र, तुला काय हवं आहे? बर्बाद व्हायचं आहे का?”.