उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून १० मार्चला निकाल येईल. यामुळे सर्वच पक्षांकडून आता निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशातील भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी आजतकच्या पंचायत कार्यक्रमात बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. “सपा सरकारच्या कार्यकाळात वीजेची परिस्थती अशी होती की, थकून आलेला शेकतरी आपल्याच हाताने पंखा हालवत बसायचा. पण आज उत्तर प्रदेशात २४ तास वीज मिळत असून शेतकरी दोनच्या जागी १० चपात्या खात आहे,” असं ते म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वतंत्र देव सिंह म्हणाले की, “सपा आणि बसपाने उत्तर प्रदेशला मागे नेण्याचं काम केलं. पण योगी सरकारने पाच वर्षात राज्याला विकासाच्या मार्गावर आणलं. सपा सरकारने गरिबांच्या हक्काच्या नोकऱ्याही विकल्या. सपाने फक्त लूटलं आणि भ्रष्टाचार केला. पण योगी सरकारने पाच लाख नोकऱ्या कोणत्याही भ्रष्टाचार न करता दिल्या. उत्तर प्रदेशात आज २४ तास वीज मिळत आहे. सपा आणि बसपाच्या कार्यकाळात वीजेची परिस्थिती खूप वाईट होती”.

देशातील साखर उद्योगास मोठा दिलासा; साडेनऊ हजार कोटींची प्राप्तीकर आकारणी माफ

“वीज नसल्याने लोकांना हातानेच पंखा चालवत हवा मिळवावी लागायची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून २४ तास वीज मिळत आहे. आधी जेव्हा थकून भागून शेतकरी आपल्या घऱी जायचा तेव्हा बायकोचा चेहरा न पाहताच जेवायचा आणि १० ऐवजी दोनच चपात्या खायचा. पण आता २४ तास वीज मिळत असून जेव्हा तो घरी जातो तेव्हा बायकोचा चेहरा पाहून दोन ऐवजी १० चपात्या खातो. आज तो आनंदी असून त्याला पंखा चालवावा लागत नाही,” असं स्वतंत्र देव सिंह म्हणाले आहेत.

स्वतंत्र देव सिंह यांनी यावेळी भाजपा सुविधर्मच्या नावे निवडणूक लढत असल्याचं म्हटलं, सु म्हणजे सुरक्षा आणि वि म्हणजे विकासाच्या नावे निवडणूक लढत आहेत. तर धर्मचा अर्थ धर्माचा, श्रद्धेचा, दलितांचा आणि मागासलेल्यांचा सन्मान झाला पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up election 2022 bjp state president swatantra dev singh farmers light sp bsp lucknow sgy
First published on: 10-01-2022 at 13:56 IST