उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलच तापायला लागलं आहे, सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, जास्तीजास्त मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टीने देखील मोठी घोषणा केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. जर उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं तर राज्यातील जनतेला ३०० यूनिट मोफत वीज दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत मनीष सिसोदिया यांनी ट्विट देखील केलं असून त्यामध्ये ते म्हणातात, उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना अवास्तव वीज बिलांपासून मुक्ती देण्यासंबंधी एक महत्वपूर्ण घोषणा..आम आदमी पार्टीचं सरकार आल्याच्या २४ तासांत प्रत्येक व्यक्तीस घरगुती वापरासाठी प्रत्येक महिन्याला ३०० यूनिट पर्यंत मोफत वीज मिळेल.

याशिवाय जुने वीज बील माफ, प्रत्येक घरी २४ तास वीज, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे देखील आश्वासन आम आदमी पार्टीकडून देण्यात आलेलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up election if we come to power we will provide free electricity up to 300 units in 24 hours aap announcement msr
First published on: 16-09-2021 at 16:13 IST