देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय प्रवासासंदर्भात भाष्य करणाऱ्या ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईमध्ये झाले. मराठीमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या पुस्तकाचं प्रकाशन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर, अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या उपस्थितीमध्ये झाले. यावेळी भाषणादरम्यान फडणवीस यांनी शाह यांच्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारवर निशाणा साधला.

नक्की वाचा >> कितीही व्यस्त असले तरी रोज रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास अमित शाह ‘या’ व्यक्तीला करतात फोन; फोनशिवाय एकही दिवस जात नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“१३ व्या वर्षी बाल्य अवस्थेत संघाच्या संपर्कात येतो १६ व्या वर्षी विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात येतो. २१ व्या वर्षी भाजपाचं काम सुरु करतोय या प्रवासात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेत जातो. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पारखी आहेत. त्यांना हिरा कुठेही दडला असला तरी तो शोधता येतो. हा हिरा त्यांनी शोधून काढला,” असं फडणवीस भाषणादरम्यान म्हणाले.

नक्की वाचा >> केंद्र सरकारकडून २६ हजार ५०० कोटींची जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर…; फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल

पुढे बोलताना, “अतिशय तरुण अवस्थेत आधी गुजरात फायनान्स कॉर्पोरेशनची जबाबदारी दिली. सहकाराच्या क्षेत्रात अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले. मग मोदी मुख्यमंत्री असताना अमित शाह गृहमंत्री झाले. त्यांनी मोदींच्या अंतर्गत काम सुरु केले. गृहमंत्री म्हणून गुजरातमध्ये काम करताना अमित शाहांनी वेगवेगळ्या योजना आखून गुजरातमधला क्राइम रेट कमी केला. कशाप्रकारे त्या ठिकाणी सामान्य माणसाला शांततने जगता यावं यासाठी कठोक पावलं उचलली. जे लोक माफियाराज चालवत होते त्यांना वटणीवर आणलं. कशाप्रकारे जे लोक वटणीवर यायला तयार नव्हते अशा लोकांचे एन्काऊंटर झाले. अशा सगळ्या गोष्टी या पुस्तकात सुंदरपणे मांडण्यात आल्यात,” असं फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा >> तीन हजार ४०० कोटींचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्य सरकारला नम्र विनंती करतो की…”

“मात्र त्यावेळी मोदींनी टार्गेट करण्याच्या उद्देशाने थेट मोदींना टार्गेट करता येत नाही म्हणून कोणाला टार्गेट करायचं तर अमित शाहांना करायंच अन् त्यांच्या माध्यमातून मोदींजीपर्यंत पोहोचायचं. हा जो काही राजकीय अजेंडा त्यावेळेच्या सोनियाजींच्या आशिर्वादाने तयार झालेल्या युपीए सरकारनं तयार केला होता. देशात हजार एन्काऊंटर झाले त्यापैकी केवळ २० एन्काऊंटरची चौकशी करायची. गुजरातमध्ये १९ एन्काऊंटर झाले आणि अन्यत्र एक अशा २० प्रकरणांची चौकशी केली. पाच राज्यांमध्ये हवा असणाऱ्या दहशतवाद्याचा एन्काऊंटर फेक दाखवून अमित शाहांना पकडण्यात आलं
तो कालखंड आणि त्यावेळेचा त्यांचा खडतर प्रवास सुंदरपणे मांडण्यात आलाय,” असंही फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस यांनी यानंतर शाहांनी तुरुंगामध्ये ज्ञानार्जन केलं असं म्हटलं. त्यानंतर शाह तुरुंगाबाहेर आल्यानंतर काँग्रेसने त्यांना गुजरात बाहेर रहावं लागेल अशी व्यवस्था केल्याने त्यांना दिल्लीत रहावं लागलं असं फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upa government tried to frame amit shah says devendra fadnavis scsg
First published on: 27-04-2022 at 18:55 IST