UPSC CSE Mains Result 2024 Declaired : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात आलेल्या यूपीएससी नागरी सेवा (CSE) मुख्य परीक्षा २०२४ चा आज (९ डिसेंबर) निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in वर पाहू शकतात. तसेच या मुख्य परीक्षेत यश मिळवलेले सर्व उमेदवार हे पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.

परीक्षा कधी झाली होती?

यूपीएससी सीएसई पूर्व परीक्षा ही १६ जून रोजी घेण्यात आली होती, तर मुख्य परीक्षा ही सप्टेंबर महिन्यात २०, २१, २२, २८ आणि २९ या तारखेला घेण्यात आली होती. त्यानंतर आज मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

कागदपत्र तयार ठेवा..

मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. दरम्यान या मुलाखतीला उपस्थित रााताना उमेदवारांना आवश्यक अशी सर्व कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. लोकसेवा आयोगाकडून लवकरच मुलाखतीच्या तारखा अधिकृत वेबसाईटवर जाहीर केल्या जातील. यादरम्यान उमेदवारांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्य असलेली कागदपत्रे, आरक्षणासंबंधी प्रमाणपत्र याबरोबरच वय, शैक्षणिक पात्रता, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे त्यांच्याकडे तयार ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा>> “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य…

उमेदवारांना निकाल कुठे-कसा पाहाल?

मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर पाहाता येईल. त्यांना पुढे देण्यात आलेल्या पद्धतीने तो तपासता येणार आहे.

१) पहिल्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.

२) येथे उघडलेल्या मुख्य पानावर तुम्हाला ‘Written Result: Civil Services (Main) Examination, 2024’ या पर्यायावर क्लीक करावे लागेल.

३) यानंतर तुमच्यासमोर स्क्रीनवर नवीन पान उघडेल.

४) येथे देण्यात आलेली नोटीस वाचा आणि खाली जाऊन तुमच्या परीक्षेसंबंधी निकाल पाहा.

५) भविष्यातील संदर्भांसाठी तुम्ही यूपीएससी सीएसई मुख्य परीक्षा निकाल २०२४ डाऊनलोड देखील करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही येथे क्लिक खरून तुमचा यूपीएससी सीएसई परीक्षेचा निकाल २०२४ पाहू शकता