UPSC CSE Result 2024 Topper List : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा, २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये लेखी परीक्षा झाली होती. तर, जानेवारी ते एप्रिल २०२५ मुलाखती पार पडल्या होत्या. अखेर या दोन्ही सत्रांचा निकाल जाहीर झाला असून युपीएससी परीक्षेत शक्ती दुबे देशात अव्वल ठरली आहे. त्यानंतर हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आणि अर्चित डोंगरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नागरी सेवा परीक्षा नियम, २०२४ च्या नियम २०(४) आणि (५) नुसार २३० उमेदवारांची एकत्रित राखीव यादी देखील ठेवण्यात आली आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने अधिकृतपणे जाहीर केलेल्या निकालांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मध्ये नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या १००९ उमेदवारांची यादी समाविष्ट आहे. upsc.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांना निकाल पाहता येणार आहे.
युपीएससीने २०२४ च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण ११३२ पदांसाठी भरती जाहीर केली होती. यामध्ये १००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यापैकी ७२५ पुरुष उमेदवार आणि २८४ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
#Congratulations to all selected candidates in UPSC 2024?#UPSC #UPSC2024 #upscresult #UPSCCSE2024 RESULT OUT NOW pic.twitter.com/AoftjFcsTM
— UPSC Network (@upscnetwork4) April 22, 2025
१००९ उमेदवारांपैकी ३३५ उमेदवार जनरल कॅटगेरी, १०९ उमेदवार आर्थिक दुर्बल घटक (EWS), ३१८ उमेदवार इतर मागासवर्गीय (OBC), १६० अनुसूचित जाती (SC), ८७ अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गातील आहेत. तर, ४५ उमेदवार दिव्यांग श्रेणीतील आहेत. सप्टेंबर २०२४ युपीएससीच्या परीक्षा झाल्या. तर,७ जानेवारी २०२५ पासून मुलाखतींना सुरुवात झाली.
UPSC Civil Services Examination 2024 results declared; Shakti Dubey, Harshita Goyal and Dongre Archit Parag secure top three positions pic.twitter.com/XjGuSi10zS
— ANI (@ANI) April 22, 2025
महाराष्ट्राचे अनेक उमेदवार विजयी
दरम्यान, युपीएससीच्या पहिल्या क्रमांकात महाराष्ट्रातील अर्चित डोंगरेचाही क्रमांक आला आहे. त्याने तिसरा क्रमांक पटकावला असून तो मुळचा पुण्याचा आहे. तर, ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलनेही ३०३ क्रमांक मिळवला आहे.