अमेरिका आणि इस्रायलने सोमवारपासून इराणविरुद्ध लष्करी सराव सुरू केला आहे. यामध्ये हजारो अमेरिकन आणि इस्रायली सैनिक आणि दोन्ही देशांची वायू सेना सहभागी झाली आहे. या संयुक्त युद्धाभ्यासाबद्दल विचारणा केली असता अमेरिकेतील एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितलं की, अमेरिकेला या युद्धाभ्यासाद्वारे इराणला संदेश द्यायचा आहे की, युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे अमेरिकेचं मध्य-पूर्वेतील परिस्थितीवरून लक्ष विचलित होऊ शकत नाही. त्याचरोबर चीनला देखील अशाच प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे.

या युद्धाभ्यासाद्वारे अमेरिका चीनला सांगू पाहतेय की, युक्रेनमधील परिस्थितीमुळे अमेरिकेचं लक्ष विचलित झालेलं नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाखाली राहू नये, अमेरिका कोणत्याही वेळी कुठेही मोठं लष्कर पाठवू शकते, अशी माहिती नवभारत टाईम्सच्या वृत्ताद्वारे देण्यात आली आहे.

israeli strikes on rafah kill 18 as gaza death toll tops 34000
इस्रायलच्या राफावरील हल्ल्यात १८  ठार
due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Israel, Iran , missile attack
विश्लेषण : इराण-इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार? परिस्थिती चिघळण्यास अमेरिकेची चूक कशी कारण ठरली?
Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”

जेट्स आणि ड्रोन्स सज्ज

या युद्धाभ्यासाला जुनिपर ओक २३ असं नाव देण्यात आलं आहे. संरक्षण विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार उभय देशांमधला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धाभ्यास आहे. यात मोठ्या प्रमाणात एअरक्राफ्ट समाविष्ट केले आहेत. यासह मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि स्फोटकं देखील समाविष्ट केली जातील.

या युद्धाभ्यासात ६,४०० अमेरिकन सैनिक आणि १,१०० इस्रायली सैनिक सहभागी होत आहेत. यासह बी-५२ बॉम्‍बर्स, १४२ एयरक्राफ्ट समाविष्ट केले जातील. यातले १०० एअरक्राफ्ट अमेरिकेचे तर ४२ एअरक्राफ्ट इस्रायलचे असतील. तसेच चार एफ-३५ फायटर जेट्स, ४५ एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट लढाऊ विमानं आणि दोन एमक्यू-९ रीपर ड्रोन्स शक्तीप्रदर्शन करतील.

हे ही वाचा >> कंगाल पाकिस्तान गृहयुद्धापासून केवळ एक पाऊल दूर; ६२ लाख बेरोजगार तरुणांचा भारताला धोका?

दोन्ही देशांच्या नौदलांचा सहभाग

अमेरिकन नौदलाचा एक कॅरियर स्ट्राईक ग्रुप आणि सहा इस्रायली जहाजं देखील या युद्धाभ्यासाचा भाग आहेत. याबद्दल अमेरिकन सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल मायकल एरिक कुरिला म्हणाले की, हा एक संयुक्त ऑल डोमेन युद्धाभ्यास आहे. यामुळे आमची हवा, जमीन आणि समुद्र तसेच आमच्या भागीदारांसोबतची अंतराळातील परस्पर कार्यक्षमता सुधारतो. तसेच याद्वारे आम्ही आमच्या मध्यपूर्वेतील वचनबद्धतेला बळकटी देत आहोत. तसेच अजून एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितलं की, अशा प्रकारचे युद्धाभ्यास पुढच्या काळात देखील होत राहतील.