अमेरिकेत लहान मुलांच्या लसीकरणाला हिरवा झेंडा; फायझर लसीच्या वापराला सरकारची परवानगी

चीन, चिली, क्युबा आणि सौदी अरेबिया या राष्ट्रांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता अमेरिकेचा नंबर लागला आहे.

अमेरिकेने शुक्रवारी फायझर या करोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांसाठीच्या वापरासाठी परवानगी दिली. यामुळे अमेरिकेतली २८ दशलक्ष बालके लवकरच लसीकृत होऊ शकणार आहे. ५ ते ११ वयोगटातल्या मुलांना फायझर लस देण्यात येणार आहे.

या आठवड्यात सरकारला सल्ला देणाऱ्या उच्चस्तरीय वैद्यकीय गटाने या लसीचं समर्थन केलं आणि सांगितलं की या लसीच्या साईड इफेक्ट्सपेक्षा लसीचे फायदे अधिक आहेत. चीन, चिली, क्युबा आणि सौदी अरेबिया या राष्ट्रांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता अमेरिकेचा नंबर लागला आहे.

ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

याविषयी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या प्रमुख जेनेट वुडकॉक यांनी सांगितलं की एक आई आणि डॉक्टर या नात्याने मला माहित आहे की पालक, शिक्षक आणि मुलंही या दिवसाची वाट पाहत होती. लहान मुलांचं लसीकरण केल्याने आपण करोनाच्या विळख्यातून मुक्त होऊन लवकरच जनजीवन पूर्वपदावर येऊ शकेल.

वैद्यकीय बाबींसंदर्भातल्या शिफारशींसाठी मंगळवारी तज्ज्ञांची बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर लसीकरण मोहिमेला वेगाने सुरूवात होईल. फायझर आणि त्यांचे भागीदार असलेले बायोएनटेक यांनी घोषणा केली की अमेरिकी सरकारने लहान मुलांसाठीच्या लसीकरणासाठी आपल्याकडून ५० दशलक्ष लसमात्रा खरेदी केल्या आहेत.

२०००हून अधिक जणांवर करण्यात आलेल्या या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांतून असे निष्कर्ष निघाले की, आजाराच्या प्रतिबंधाच्या बाबतीत ही लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. इतर ३०००हून अधिक मुलांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला. त्यात ही लस सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Us authorises pfizer covid 19 vaccine for children aged 5 to 11 vsk

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या