पंजाबमध्ये १९९० साली झालेली बंडाळी शमविताना मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत येथील शीख हक्क गटाने पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग यांच्याविरोधात अमेरिकी न्यायालयाकडून समन्स मिळविला आह़े पंतप्रधान चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असल्याच्या पाश्र्वभूमीवर हा सन्मन घेण्यात आला आह़े अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्याशी होणाऱ्या बैठकीसाठी ते गुरुवारी येथे आले आहेत़
‘द सिख फॉर जस्टीस’ (एसएफजे) या न्यूयॉर्कस्थित संघटनेकडून आता हा सन्मस तातडीने डॉ़ सिंग यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ त्यासाठी येथील कायद्यानुसार ते व्हाइट हाऊस कर्मचारी आणि त्यांच्यामाध्यमातून सिंग यांच्या सुरक्षा ताफ्यापर्यंत पोचविण्याचे आदेश मिळविण्याचे प्रयत्न होत आहेत़
तज्ज्ञ सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांना हा समन्स देणे, हे फारच अवघड काम आह़े न्यायालयाकडून व्हाइट हाऊससाठी या समन्सबद्दल आदेश मिळविण्यातही अनेक कार्यप्रणालीच्या गुंतागुती आहेत़ ही एसएसजेची प्रसिद्धीची क्लृप्ती आहे, असे न्यूयॉर्क येथील अॅटर्नी रवी बत्रा यांनी सांगितल़े
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2013 रोजी प्रकाशित
अमेरिकी न्यायालयाचे पंतप्रधानांना समन्स
पंजाबमध्ये १९९० साली झालेली बंडाळी शमविताना मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत येथील शीख हक्क गटाने पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग यांच्याविरोधात अमेरिकी न्यायालयाकडून समन्स मिळविला आह़े

First published on: 27-09-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us court issues summons against manmohan singh