US Mass Stabbing at michigan walmart : अमेरिकेतील मिशिगनमधील ट्रॅव्हर्स सिटीतील एका वॉलमार्ट स्टोअरमध्ये किमान ११ जणांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. तर मिशिगन स्टेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुन्सन हेल्थकेअर (Munson Healthcare) ने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार, उत्तर मिशिगनमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात किमान ११ लोकांवर उपचार केले जात आहेत. हेल्थकेअरच्या प्रलक्त्या मेहन ब्राऊन यांनी सांगितले की ११ जणांवर चाकूने हल्ला झाला असून त्यापैकी सह जणांची प्रकृती नाजूक आहे.

मिशिगन स्टेट पोलिसांनी स्पष्ट केले की चाकू हल्ल्याच्या संबंधित माहिती ही मर्यादीत आहे आणि स्थानिक शेरिफ ऑफिस, ग्रँड ट्रॅव्हर्स काउंटी शेरिफ ऑफिस हे सध्या या घटनेचा तपास करत आहेत. तसेच प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू असेपर्यंत लोकांनी या भागात येणे टाळावे असे अवाहन केले आहे.

डेट्रॉईट शहरापासून ४१० किलोमीटर वायव्येस असलेल्या मिशिगनच्या ट्रॅव्हर्स सिटीमध्ये ही चाकूहल्ल्याची घटना घडली आहे. या शहरात सुमारे १६,००० लोक राहतात.