Donald Trump On Israel Iran Conflict Updates : इस्रायल-इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस आणखी वाढत चालला असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून एकमेकांच्या शहरांना टार्गेट करत हवाई हल्ले केले जात आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट करत हवाई हल्ले केले आहेत, तर इराणने इस्रायलमधील काही शहरांना टार्गेट करत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागले आहेत. या संघर्षात दोन्ही देशांचं नुकसान होत आहे. मात्र, तरीही हा संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये.

यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-इराण संघर्षाबाबत पुन्हा एकदा मोठं भाष्य केलं आहे. इराणवरील हवाई हल्ले थांबवण्यास सांगणं कठीण असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचाही खात्मा झाला आहे. त्यानंतर इराण दखील आणखी आक्रमक पद्धतीने हल्ले करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांकडून करण्यात येत असलेल्या हवाई हल्ल्याचे काही व्हीडीओ देखील समोर आले आहेत.

दरम्यान, इस्रायल-इराणमधील संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी असे संकेत दिले की, ठप्प झालेली राजनैतिकता आणि संयुक्त राष्ट्रांसह इतर देशांकडून तणाव कमी करण्यासाठी वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावानंतरही ते इस्रायलला इराणवरील हवाई हल्ले थांबवण्यास सांगण्याची शक्यता कमी आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

न्यू जर्सीमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की इस्रायलच्या सध्याच्या लष्करी बळामुळे दोन्ही देशांतील संघर्ष किंवा हवाई हल्ले थांबवण्यासाठी कोणतीही विनंती राजनैतिकदृष्ट्या कठीण आहे. ट्रम्प म्हणाले की, “मला वाटतं की सध्या अशी विनंती करणं खूप कठीण आहे. जर कोणी जिंकत असेल तर ते एखाद्याच्या पराभवापेक्षा थोडे कठीण आहे. मात्र, आम्ही तयार आहोत. इच्छुक आहोत आणि सक्षम आहोत आणि आम्ही इराणशी बोलत आहोत आणि काय होतं ते पाहूयात”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी याआधी इराणला दिला होता इशारा

इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल माध्यमावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्याबाबत आतापर्यंतचं सर्वात मोठं विधान केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला माहित आहे की तथाकथित सर्वोच्च नेते (इराणचे सर्वोच्च नेते) कुठे लपले आम्हाला चांगलंच माहिती आहे. ते सोपे टार्गेट आहेत, पण ते तिथे सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना बाहेर काढणार नाहीत (मारणार नाही), किमान सध्या तरी नाही. पण आम्हाला नागरिकांवर किंवा सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत. पण आमचा संयम सुटत चालला आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इराणकडून मोठी किंमत वसूल केली जाईल’, इस्रायलचा इशारा

दक्षिण इस्रायलमधील सोरोका मेडिकल सेंटरवर गुरूवारी पहाटे इराणचे क्षेपणास्त्र येऊन आदळले आणि एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले असून भरपूर नुकसान झाल्याचं इस्रायल सरकारच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. दरम्यान मेडिकल सेंटरवर हल्ल्या केल्याची इराणकडून मोठी किंमत वसूल केली जाईल, असा इशारा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिला होता.