मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये गोळीबार आणि नरसंहाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टेक्सास येथील शाळा, ओकलाहोमा आणि न्यूयॉर्कमधील मार्केट स्टोअरमध्ये माथेफिरुंनी केलेला बेछूट गोळीबार यामुळे अमेरिकेत अस्वस्थता पसरली आहे. या सर्व घटनांमुळे सध्या अमेरिकेत नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. असे असताना आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शस्त्रपरवान्याचे नियम कठोर करण्याचे संकेत दिले आहेत. शस्त्र खरेदी करण्याचे किमान वय १८ वरुन २१ वर्षे करण्यात यावे असे मत बायडेन यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> मुसेवाला हत्या : हत्याकांडांनंतर पाच दिवसांनी स्थानिक AAP आमदार सांत्वनासाठी मुसेवालांच्या घरी गेले असता स्थानिकांनी…

सामूहिक गोळीबार रोखण्यासाठी नियम कठोर करण्यात यावेत असे मत जो बायडेन यांनी व्यक्त केले. पुढच्या आठवड्यात व्हाईट हाऊसतर्फे यावर कठोर निर्णय घेण्यात येईल असे संकेत त्यांनी दिले. “आपण अजून किती नरसंहार स्वीकारणार आहोत. शस्त्र खरेदी करण्याचे किमान वय १८ वरुन २१ वर्षे करण्यात यावे. तसा कायदा करायला हवा. यामुळे शाळा, रुग्णालयांवर होत असेलेले हल्ले कमी होतील,” असे बायडेन म्हणाले.

हेही वाचा >> ज्ञानवापी प्रकरणात सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “प्रत्येक मशिदीत शिवलिंग…”

तसेच शस्त्रे देण्यापूर्वी खरेदी करणाऱ्याची पार्श्वभूमीची तपासली जावी. तसेच जास्त संहारक बंदुकींवर देण्यावर बंदी घालण्यात यावी, बंदुका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात याव्यात, तसेच एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलाच तर बंदूक उत्पादकांनादेखील जबाबदार धरले जावे, असे मत जो बायडेन यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >> परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

“मागील दोन दशकांत लष्करी कर्त्यव्यावर असलेले शिपाई आणि पोलिसांपेक्षा शाळेतील मुले मृत्युमुखी पडलेली आहेत. याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल,” असे म्हणत बायडेन यांनी अमेरिकेतील नरसंहाराबद्दल चिंता व्यक्त केली.

हेही वाचा >> काश्मीरमध्ये हत्यासत्र सुरूच ; दहशतवाद्यांकडून बँक व्यवस्थापकाची हत्या, महिन्याभरात आठ बळी

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने शस्त्र खरेदी आणि शस्त्र बाळगण्यासंदर्भातील कायदे कठोर करण्याला विरोध दर्शविला आहे. याच कारणामुळे बायडेन यांनी रिपब्लिकन पार्टीलादेखील लक्ष्य केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us president joe biden appeals for tougher gun laws said thinking to increase weapon purchase age prd
First published on: 03-06-2022 at 10:03 IST