उत्पादन व सेवा क्षेत्राला फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेने चीनच्या पक्षपाती व्यापार पद्धतींची चौकशी सुरू केली असून, त्यामुळे त्यांच्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. व्यापार कायदा १९७४च्या कलम ३०१ अनुसार चीनच्या बौद्धिक संपदा संबंधित व्यवहारांची चौकशी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटझर यांनी सुरू केली असून, त्याआधी संबंधित सरकारी संस्थांशी सल्लामसलत करण्यात आली.

हे मुद्दे चौकशी करण्यायोग्य आहेत व व्यापार कायद्यानुसार आपण त्याची चौकशी सुरू करीत आहोत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिसूचित केले आहे. चीन हा अमेरिकेचा मोठा व्यापार भागीदार असून, वार्षिक वस्तू व सेवा व्यापार हा ६६३ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा आहे.

१४ ऑगस्टला ट्रम्प यांनी चीनच्या व्यापार पद्धतींची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. अमेरिका हा जगातील एक प्रमुख देश असून, तो संशोधन व विकास यात आघाडीवर आहे.  त्यातच बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन झाल्याने व चुकीच्या पद्धतीने तंत्रज्ञान हस्तांतर झाल्याने अमेरिकेची जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता कमी होत आहे.

अमेरिकेच्या उत्पादन व सेवा क्षेत्राला फटका बसत आहे. चीन सरकार काही अलिखित नियम बेदरकारपणे लागू करून काही वेळा राष्ट्रीय नियमावली बाजूला ठेवून स्थानिक नियमावली वापरत आहे. त्यातही हे सर्व निवडक व अपारदर्शक पद्धतीने केले जात आहे.

चीन सरकारच्या कृती, धोरणे व कार्यपद्धती यामुळे अमेरिकी कंपन्यांनी परवान्यांबाबत तसेच तंत्रज्ञान वाटाघाटींबाबत बाजारपेठेवर आधारित नियम तयार केले आहेत, त्यामुळे चिनी कंपन्यांचा फायदा होत आहे. चीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानावर अमेरिकेचा नंतर अधिकार राहत नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

व्यापारात तोटा

चीनच्या व्यापारविषयक धोरणांमुळे अमेरिकेची निर्यात बंद होऊन अमेरिकी नागरिकांना त्यांच्या अभिनव तंत्रज्ञानाचा मोबदला मिळत नाही. अमेरिकी लोकांच्या नोकऱ्या चीनमधील कर्मचाऱ्यांना मिळत आहेत व त्यामुळे अमेरिकेचा चीनशी व्यापारात तोटा होत आहे, असा आरोप अमेरिकेने चीनवर केला आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us to review china intellectual property policies
First published on: 20-08-2017 at 01:13 IST