दीपोत्सवाच्या विश्वविक्रमासाठी अयोध्या सज्ज; नऊ लाख दिव्यांसह ५०० ड्रोन्समधून साकारणार रामायण काळातील दृश्य

दीपोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केनिया, व्हिएतनाम आणि त्रिनिदाद-तुबागो येथील राजनैतिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत

Uttar Pradesh Yogi adityanath govt deepotsav ayodhya
(फोटो सौजन्य इंडियन एक्सप्रेस)

बुधवारी अयोध्येत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या आणि सर्वात भव्य दीपोत्सवात सात लाख ५१ हजार दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या दीपोत्सवाच्या पाचव्या वर्षी रामपदीवर एकाच वेळी सात लाख ५१ हजार दिवे प्रज्वलित करून अयोध्येत विश्वविक्रम रचण्याची तयारी केली आहे. यासाठी अवध विद्यापीठाची संपूर्ण टीम दोन दिवस मेहनत घेत आहे. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी आदित्यनाथ सरकारचा हा शेवटचा मोठा कार्यक्रम असण्याची शक्यता आहे.

मंगळवारी रामपडीतील घाटांवर नऊ लाख दिवे लावण्यात आले आहेत. बुधवारी हनुमान जयंतीला दीपोत्सवाचा मुख्य उत्सव साजरा होणार आहे. दीपोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह केनिया, व्हिएतनाम आणि त्रिनिदाद-तुबागो येथील राजनैतिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अयोध्येच्या पाचव्या दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुपारी दोनच्या सुमारास तेथे पोहोचतील. मुख्यमंत्री आधी रामलल्लाचे दर्शन घेतील. यानंतर रामकथा पार्क येथे मिरवणुकीचे स्वागत होईल. यानंतर रामकथा पार्कच्या हेलिपॅडवर पुष्पक विमानातून भगवान श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांचे पात्र करण्यांना आणले जाणार आहे. त्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांसह प्रमुख पाहुण्यांचे केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी आरती करून स्वागत करतील.

दीपोत्सवाच्या विश्वविक्रमानंतर लेझर शो होणार आहे. गेल्यावर्षीच्या दीपोत्सवात सहा लाख सहा हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. यावर्षी सात लाख ५१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.

यावेळी उत्सवांमध्ये ५०० ड्रोनद्वारे एक हवाई शो देखील होणार आहे ज्यामध्ये अॅनिमेशनद्वारे रामायण काळातील दृश्यांचे चित्रण करण्यात येणार आहे. शरयू नदीच्या काठावरील भव्य राम की पायडी घाटावर ३-डी होलोग्राफिक शो, ३-डी प्रोजेक्शन मॅपिंग आणि लेझर शो ही इतर आकर्षणे असतील. अयोध्या दीपोत्सव आज किमान ७.५१ लाख मातीचे दिवे प्रज्वलित करून आणखी एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttar pradesh yogi adityanath govt deepotsav ayodhya abn

Next Story
Corona Update: गेल्या २४ तासांत ३११ रुग्ण दगावले, नवीन बाधितांच्या संख्येत वाढ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी