Rain Update : उत्तराखंड येथे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून येथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले वाहू लागले असून राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक नद्यांना पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. वाहतूक कोलमडली आहे. दरम्यान, अशाच पूरग्रस्त भागातून जात असलेली एक बस वाहत्या नदीत अडकल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
उत्तराखंड येथे रामगढ गावात एक बस पूरग्रस्त नदीत अडकली आहे. नदीच्या पाण्याला जोरदार प्रवाह असल्याने बस एका बाजूलला कलंडली असून जीव वाचवण्याकरता प्रवासी बसच्या टपावरून उड्या मारत आहेत. हिमाचल प्रदेश रोडवेजची ही बस असून ती डेहराडूनला जात होती. मात्र, विकासनगरजवळ ती अडकली.
हेही वाचा >> काळ आला होता पण वेळा नाही! घाटात प्रवास करणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडीओ मिस करू नका
बस नदीत अडकल्याचं कळताच प्रवाशांनी बसून उड्या मारण्याचा प्रयत्न केला. तसंच, आपले सामानही बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांना वाचवण्याकरता अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. दरम्यान, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
उत्तराखंड येथे जोरदार पावसाचा अंदाज
दरम्यान, उत्तराखंड येथे पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसंच, प्रमुध नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चामोली, पुरी, बागेश्वर, अलमोरा, चंम्पावत, नैनिताल, उधम सिंग नगर येथे ११ आणि १२ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
हेही वाचा >> तरुणाला नग्न करून मारहाण, Video केला व्हायरल; हल्लेखोरांनी शपथ घ्यायला लावली की…
मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी भूस्खलनामुळे सहा जणांचा जीव गेला आहे. केदारनाथ येथून ११ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक जीप मुनी की रेती परिसरात गंगा नदीत पडली. या अपघातात पाच जणांना वाचवण्यात पोलिसांना यश आले असून तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर इतर तिघांचा शोध सुरू आहे.