पीटीआय, उत्तरकाशी

Uttarakhand tunnel collapses live updates उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात गुरुवारी पुन्हा अडथळा आला. त्यामुळे बचावकार्य पुन्हा थांबले असून मजुरांच्या सुटकेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.खोदकाम करणारे ऑगर यंत्र ठेवलेल्या प्लॅटफॉर्मला तडा पडल्याने खोदकाम गुरुवारी सायंकाळी पुन्हा थांबवावे लागले.  २५ टन वजनाचे ऑगर यंत्र ज्या प्लॅटफॉर्मवर ठेवले आहे, तो बचाव मोहिमेतील कामगारांनी स्थिर केल्यानंतरच खोदकाम पुन्हा सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यापूर्वी, बुधवारी रात्रभर अडथळा आल्यामुळे अनेक तास विलंब झालेली मोहीम गुरुवारी सकाळी पुन्हा सुरू झाली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळाला भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच त्यांनी अडकलेल्या मजुरांशी संवादही साधला.बोगद्याच्या कोसळलेल्या भागाच्या ढिगाऱ्यातून ऑगर यंत्राचे खोदकाम सुरू असताना आणखी काही अडथळे न आल्यास ही मोहीम रात्रीतच संपवण्याचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, पुन्हा आलेल्या अडथळ्यामुळे गेल्या ११ दिवसांपाून बोगद्यात अडकलेले मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आशेला धक्का बसला आहे.

हेही वाचा >>>Uttarkashi Tunnel Rescue : बचाव मोहीम अंतिम टप्प्यात, बोगद्यात रुग्णवाहिका तैनात, देश सुटकेचा निश्वास सोडणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 मजुरांसाठी सुटकेचा मार्ग तयार करण्यासाठी यंत्राद्वारे सुरू असलेल्या खोदकामाच्या मार्गातील लोखंडी तुळईचा अडथळा सकाळी हटवण्यात आला, असे घटनास्थळी हजर असलेले पंतप्रधान कार्यालयातील माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी सांगितले.  या अडथळय़ामुळे ५७ मीटर लांबीच्या ढिगाऱ्यातील खोदकामाला बुधवारी रात्री सहा तास उशीर झाला. ऑगर यंत्र जसजसे खोदकाम करेल, तसतसे ढिगाऱ्यातून स्टील पाइपचा एकेक तुकडा आत घुसवला जाणार आहे. तुकडा दुसऱ्या बाजूने बाहेर आला, की अडकलेल्या मजुरांना एकेक करून बाहेर काढले जाईल. या मजुरांना  स्ट्रेचर्सवर झोपवून बाहेर काढले जाईल. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत.